समग्र शिक्षा कर्मचार्‍यांच्या मानधात 10 टक्के वाढ 

0
39

– गोंदियातील 148 तर राज्यातील 5500 कर्मचार्‍यांना लाभ

गोंदिया,दि.15ः- समग्र शिक्षा अंतर्गत गेल्या दोन दशकांपासून कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचार्‍यांच्या मानधनात पाच वर्षापासून कोणतीही वाढ झाली नव्हती.कर्मचार्‍यांनी त्यांच्या मागण्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन व आंदोलन करून शासन दरबारी मांडल्या.या लढ्याला अखेर यश आले असून बुधवार 14 डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत समग्र शिक्षा अभियानातील कर्मचार्‍यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने गोंदिया जिल्ह्यातील 148 तर राज्यातील सुमारे 5500 कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे.शिक्षणापासून वंचित असणार्‍या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करुन शिक्षणाच्या संख्यात्मक विकासाबरोबर गरजांमध्येही सुधारणा करण्यात समग्र शिक्षा हा केन्द्र व राज्य शासनाचा संयुक्त कार्यक्रम सुरू आहे.या कर्मचार्‍याद्वारे विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते.जिल्ह्यात 148 कंत्राटी कर्मचारी आहेत.मागील 20 वर्षांपासून दरमाह एकत्रित अल्पशः मानधनावर हे कर्मचारी राबताहेत.यांना शासनाच्या कोणत्याही सोयी-सुविधा नाहित.विशेष म्हणजे यांचा भविष्य निर्वाह निधीही कपात होत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने या कर्मचार्‍यांचा विमाही नाही.दरवर्षी या कर्मचार्‍यांच्या मानधनात 8 टक्के वाढ होणे अपेक्षित असताना गत 5 वर्षापासून कोणतीही वाढ झालेली नव्हती. मानधन वाढीसंदर्भात अनेकदा कर्मचार्‍यांनी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, मंत्री ते मंत्रालयात
प्रत्यक्ष चर्चा केली, निवेदने दिलीत, मात्र यांच्या मानधन वाढीचा तिढा कायम होता.मुंबई येथील बैठकीमध्ये शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी संबंधीत अधिकार्‍यांशी चर्चाकरून 10 टक्के मानधनात वाढ करवून दिली.

आ. अग्रवालांनी मांडली होती लक्षवेधी
समग्र शिक्षा अभियानातील कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्याच्या संदर्भात स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती.बुधवारी पार पडलेल्या बैठकीत अग्रवाल यांनी पुन्हा सदर बाब उपस्थित करुन मंत्री व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला.यावेळी आ.विनोद अग्रवाल यांच्यासह शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल,शिक्षण आयुक्त सुरज मांढरे,एससीएफआरटीचे संचालक राजेश पाटील, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, अव्वर सचिव संतोष गायकवाड,उपसंचालक मसीर सावंत उपस्थित होते.ते
या मागण्याही झाल्या मान्य
मानधनवाढीचा लाभ एप्रिल 2022 पासुन मिळणार, शासनाच्या पदभरतीत वयोमर्यादेा शिथिल करुन समायोजनाची संधी,निवृत्ती वय आरोग्य अभियानातील कर्मचार्‍यांच्या धर्तीवर 60 ते 65 वर्ष,13 महिन्याचे मानधन 12 महिन्यांमध्ये विभाजित करुन अर्जित रजा उपभोगाचा लाभ, महिला कर्मचार्‍यांना बाल संगोपन रजा लाभ. आदी मागण्याही मान्य झाल्या आहेत. जिल्ह्यातील समग्र शिक्षा कर्मचर्‍यांनी आ. विनोद अग्रवालांचे आभार मानले.