जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया येथे तीन दिवसीय विज्ञान आणि गणित कार्यशाळेचे उद्घाटन

0
37
; जिल्हयातील 57 गणित व विज्ञान शिक्षकांचा सहभाग
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे आणि आयसर पुणे यांचा संयुक्त उपक्रम
गोंदिया, (दि. 20 डिसेंबर):   महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे आणि भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था(IISER), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इनोव्हेशन कोचेस तयार करण्यासंदर्भात तीन दिवसीय विज्ञान आणि गणित कार्यशाळा जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, गोंदिया यांच्या सह्ययोगाने यशस्वीरित्या आज दि. 20 डिसेंबर ला  सुरू झाली.
या कार्यशाळेचे प्रयोजन हे आयराईज/IRISE (Inspiring India in Research Innovation and Stem Education) उपक्रमाअंतर्गत शिक्षकांना नवोपक्रम, STEM शैक्षणिक आशय ज्ञान आणि मूल्यमापन साधनांवर मार्गदर्शन करणे आहे. ह्या कार्यशाळेनंतर, शिक्षक शाळेतील मुलांमध्ये सर्जनशीलता, समस्या सोडवण्याचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन रुजवण्याचा प्रयत्न, 7 इनोवेशन मॉडेल, प्रशिक्षण पद्धत, सत्राच्या संकल्पना, पद्धती आणि धोरणे यांच्या द्वारे करतील.
 सर्व सत्रांचे नियोजन दुसऱ्या टप्यातील इनोव्हेशन चॅम्पिअन्स म्हणून माध्यमिक शिक्षक संजय कटरे (तिरोडा),  असीम बॅनर्जी (गोरेगाव), मनोज पंधरे, श्रीमती ओमेश्वरी बिसेन (आमगाव) व  केशव लोकनार तसेच iRISE टीम शिवानी आग्रे, सोनल थोरवे, यांच्या द्वारे घेण्यात येईल.
सदर कार्यशाळा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, आयसर पुणे, ब्रिटिश कौन्सिल, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, टाटा टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित आयराईझ (iRISE) टीचर डेव्हलमेंट प्रशिक्षणच्या तिसऱ्या टप्प्यातील हा तीन दिवसीय कॅस्केड प्रशिक्षण आहे.
या कार्यशाळेच्या उदघाटन कार्यक्रमास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) चे प्राचार्य   राजेश रुद्रकार, अधिव्याख्याता  डॉ. नरेश वैद्य,  भाऊराव राठोड, पूनम घुले, विज्ञान विषय सहायक शालिक कठाने ह्यांच्या सह iRISE प्रोग्राम टीम, आयसर पुणे हे उपस्थित होते.जिल्हयातील 57 गणित व विज्ञान शिक्षकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. तसेच या प्रशिक्षणात सर्व सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.