दहावीच्या जुन्या परीक्षा केंद्रासाठी विद्यार्थ्यांचे एआयएसएफ तर्फे जिल्हा परिषदॆवर धरणे आंदोलन

0
18
भंडारा -: शशांक माध्यमिक विद्यालय कवडशी तहसील जिल्हा भंडारा येथील दहाव्या वर्गाचा जुना परीक्षा केंद्र बेला या वर्षी सुद्धा कायम राहावा म्हणून आज दिनांक 27 /2 /2023 ला सकाळी अकरा वाजेपासून विद्यार्थी व पालक यांचा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने कॉम्रेड हिवराज उके काॅे.वैभव चोपकर व काॅ. मीनाक्षी मेहर यांच्या नेतृत्वात व सर्वश्री तेमदेव तितरमारे ,जितेंद्र गजभिये, रवींद्र पागाडे, सुरज सिंग जाटव, महेश लुटे, विकी ठवकर इत्यादी पालक व 38 विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
     यावर्षी सशांक विद्यालय कवडसीच्या दहावीच्या परीक्षा केंद्र बदलून कोंढी हा 15 किलोमीटर लांब असलेला केंद्र देण्यात आला. सदर केंद्र बदलताना शाळेला व व्यवस्थापन समितीला विश्वास न घेता शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा व नागपूर बोर्डाने केंद्र बदलण्यात आला. कोंडी हा केंद्र 15 किलोमीटर लांब व जाने येण्याच्या साधनांचा अभाव, जंगलाच्या व खराब रस्ता असलेला केंद्र असल्याने गैरसोयीचा आहे व तो आम्हाला मान्य नाही. 2022 चा जुना केंद्र बेलाच मिळावा म्हणून शाळेने व बेला केंद्र शाळेने आपली संमती दिली आहे.
     नागपूर बोर्डाच्या मागणीनुसार शिक्षणाधिकाऱ्याने आपला शिफारस पत्र लिहून दिला आहे परंतु पाच वाजेपर्यंत जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलनात बसल्यावर ही शिक्षणाधिकार्‍याने परीक्षा केंद्र बदलून दिला नाही. शिक्षणाधिकाऱ्याबरोबर शिष्टमंडळाच्या झालेल्या चर्चेत आम्ही त्यांना सांगितलं की पाच वाजेपर्यंत मागणी मंजूर न झाल्यास शिक्षणाधिकाऱ्याच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
परीक्षेच्या तोंडावर  अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.याला जबाबदार शिक्षणाधिकारी आहे.मागणी मान्य झाल्या शिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशी माहिती संघटनेच्या पुढार्‍याने दिली आहे.