गोंदिया मेडिकल कॉलेजबाबत पटेलांची एमसीआय प्रमुखांशी चर्चा

0
10

गोंदिया : गोंदियातील परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत मेडिकल कौंसिल ऑफ इंडियाची (एमसीआय) चमू गोंदियाला पुन्हा भेट देवून गेली.खा.प्रफुल्ल पटेल यांनी एमसीआयच्या प्रमुखांची भेट घेऊन गोंदिया मेडिकलबाबत चर्चा केली.
यात खा.पटेल यांनी यावर्षी कोणत्याही स्थितीत गोंदियात मेडिकल कॉलेज सुरू करण्यात यावे. मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.आघाडी व यूपीएच्या शासनात त्यासाठी मंजुरी देण्यासोबत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्व विषयांना लक्षात घेवून एमसीआयने त्वरित निर्णय घ्यावा. या विषयात गरज पडली तर ते मुख्यमंत्री व केंद्रातील संबंधित मंत्र्यांची भेट घेवून चर्चा करतील, असे खा.पटेल म्हणाले.