भाग्यश्री बिसेनने पटकाविला जिल्ह्यात प्रथम क्रमांक

0
7

गोंदिया : येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी भाग्यश्री नरेश बिसेन हिने (९३.५४) जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. भाग्यश्री ही एकोडी या ग्रामीण भागातील रहिवासी आहे. 
भाग्यश्रीच्या यशस्वीतेबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांनी तिच्या घरी जाऊन तिला सन्मानित केले. याप्रसंगी तिचे वडील नरेश बिसेन, आई नम्रता बिसेन, डॉ. एच.आर.त्रिवेदी, प्रा.एस.बी.गुप्ता, प्रा. नरेश असाटी, सरपंच रवी पटले, राजेश तायवाडे, विष्णुदयाल बिसेन व गावकरी उपस्थित होते. एमबीबीएसचे शिक्षण घेऊन डॉक्टर बनन्याची इच्छा भाग्यश्रीने याप्रसंगी व्यक्त केली. तिचे गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव आमदार राजेंद्र जैन यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी तिचे कौतूक केले. 
पशिने महाविद्यालय, दासगाव 
गोंदिया : तालुक्यातील ग्राम दासगाव येथील अर्चना पशिने कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के तर कला शाखेचा निकाल ९0.७१ टक्के लागला आहे. 
विज्ञान शाखेत दिपेश सुदाम पटले याने (८५.५३) केंद्रातून प्रथम, गुलअफशा कुरेशी हिने (८२.९२) द्वितीय तसेच स्वाती कोल्हे व रूपाली मेश्राम यांनी (८१.६९) तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तर कला शाखेत रितीू पिछोडे हिने (७८.९२) केंद्रातून प्रथम, नेहा बिसेन हिने (७७.८४) द्वितीय तर माहेश्‍वरी तुरकर हिने (७६.६१) तृतीय क्रमांक पटकाविला आहे. त्यांचे प्राचार्या व्ही.पी.बिसेन यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कौतूक केले आहे. 
राजस्थान कनिष्ठ महाविद्यालय 
गोंदिया : येथील राजस्थान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६ टक्के लागला आहे. यात मेघा रमेश अग्रवाल हिने (८७.३८) प्रथम, नेहा गजेंद्रनाध रहांगडाले हिने (८३.२३) द्वितीय, धनश्री जयंत अडगुलवार हिने तृतीय, श्रृतीरूपा नयनरंजन पत्ती हिने चौधा तर साक्षी राजेश असाटी हिने पाचवा क्रमांक पटकाविला आहे. त्यांचे संस्था अध्यक्ष सिताराम अग्रवाल, किरण मुंदडा, सचिव प्रकाशचंद्र कोठारी, वेदप्रकाश गोयल, राजेश अग्रवाल, प्राचार्य पंकज शर्मा, अभिषेक अग्रवाल आदिंनी कौतूक केले आहे. 


छत्रपती शिवाजी क. महाविद्यालय 
देवरी : येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल ६७टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ७८.0५टक्के लागला आहे. यामध्ये संतोष पुरुषोत्तम मेश्राम (७0.९२) याने प्रथम, छाया सजन कळय़ाम (७0.१५)हिने द्वितीय तर प्रतिमा काशीराम मडावी (६७.५३) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. 
तसेच विज्ञान शाखेचा निकाल ७४ टक्के लागला असून यामध्ये आरती मधुकर तांडेकर (५९.७) हिने प्रथम, धनश्री यशवंत शेंडे (५८)हिने द्वितीय तर शुभम सुरेश मेश्राम (५७.८५) तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व विद्यार्थ्यांचे संस्था सचिव झामसिंग येरणे, सहसचिव अनिल येरणे, प्राचार्य एम.जी. भुरे, तसेच सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी कौतूक केले आहे.


मनोहरभाई पटेल महाविद्यालय
देवरी : येथील मनोहरभाईपटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८८.४१ टक्के लागला. यात विज्ञान शाखेचा निकाल ९५.७ टक्के लागला तर कला शाखेचा निकाल ८१.७५टक्के लागला आहे. 
विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक शिल्पा आनंद राऊत (७८.४६), द्वितीय क्रमांक सर्वप्रितकौर हरपालसिंग भाटीया (७६.३0) तर तृतीय क्रमांक मुस्कान राजकुमार अग्रवाल (७५.६९) हिने पटकाविला आहे. विज्ञान शाखेत एकूण १४२ विद्यार्थ्यापैकी १३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत मुलेशकुमार जगदीश अरकरा (७९.५३) याने प्रथम, जोत्सना गजानन चज्रे (७५.५३) हिने द्वितीय तर वंदना इसरु नेताम (७१.७) हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. कला शखेतून १३७ विद्यार्थ्यांपैकी ११२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. 
जाहीर झालेल्या निकालात मुलेश अरकरा या विद्यार्थ्याने ७९.५३टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक वासुदेव गजभिये, सचिव रामकुमार गजभिये, के.सी. शहारे, उपमुख्याध्यापक के.बी. गोंडाणे, पर्यवेक्षक एस.टी. हलमारे, मुख्याध्यापक पी.जी. वैद्य व सर्व कर्मचार्‍यांनी कौतूक केले.