पदवीसाठी सेमिस्टर तर पदव्युत्तरला चाइस बेस क्रेडिट सिस्टम पद्धत लागू

0
7

नागपूर – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 15 जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून पदवी अभ्यासक्रमासाठी सेमिस्टर तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला चाइस बेस क्रेडिट सिस्टम पद्धत लागू करण्यात येईल. बुधवारी झालेल्या विद्वत परिषदेत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

अपुरे मुनष्यबळ आणि प्राध्यापकांचा तुटवडा असणाऱ्या नागपूर विद्यापीठाला ही शिक्षण प्रणाली अंगलट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहेत. राज्यासह देशातील सर्व विद्यापीठांमध्ये सीबीसीएस पद्धत लागू करण्यावर राज्यपाल सी. विद्यासागर यांच्याकडून काही दिवसांपूर्वीच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात सीबीसीएस पद्धत लागू करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार वर्षभरापासून विद्यापीठ यासाठी काम करत असून, अभ्यासक्रम तयार करण्यात आला. विद्वत परिषदेत यावर शिक्कामोर्तब होणार असून, 15 जूनपासून सुरू होणाऱ्या विद्यापीठाच्या नव्या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्यात येईल. त्यानुसार बीए, बीकॉम यासारख्या अभ्यासक्रमांमध्येही सेमिस्टर प्रणाली लागू होईल.