चार लाखाचा बक्षिस असलेला जहाल नक्षलवाद्याला अटक

0
5

गडचिरोली,दि.9-चार लाखांचे बक्षिस असलेल्या एका जहाल नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. शामलाल उर्फ शामराव भिमा जुरी (वय २६) असे त्याचे नाव असून तो पखांजूर तालुक्यातील गोटुलवाडा येथील रहिवासी आहे. पेंढरी पोलीस उपविभागांतर्गत नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जुरीला पोलिसांनी अटक केली. शामलाल जुरी हा अँक्शन टीम सदस्य म्हणून कार्यरत होता. तसेच कसनसूर दलमचा सदस्य होता. त्याचा १० नक्षली गुन्ह्यांमध्ये सक्रीय सहभाग होता. पाच चकमकी व बांदे पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकार्‍यांच्या हत्या याशिवाय तिरजागड येथे शत्रू सलाम याची हत्या व छत्तीसगडमधील गाव नंबर ८४ येथील जाळपोळीत त्याचा सक्रीय सहभाग होता, अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे. या जहाल नक्षलवाद्यास अटक केल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.