डॉ. युगल UPSC परीक्षा उत्तीर्ण: मिळाली ऑल इंडिया 535 वी रँक…

0
63

जि.प. शिक्षक कृष्णकुमार व गायत्री कापसे यांचा वाढविला मान; जिल्ह्यातील शिक्षक परिवारात आनंद…

गोंदिया, (दि. 16): स्थानिय हनुमाननगर, रिंग रोड स्थित शिक्षक कृष्णकुमार व गायत्री कापसे यांचा मोठा मुलगा डॉ. युगल यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये ऑल इंडिया 535 वी रैंक घेऊन उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे डॉ. युगलचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आई वडील शिक्षक असल्याने जिल्ह्यातील शिक्षक वर्गात आनंद असून मुलासोबत आई वडीलांचेही अभिनंदन केले जात आहे.

गोंदिया जिल्ह्यासाठी ही गर्वाची व आनंदाची बाब असून ते ग्राम काचेवाणी (ता. तिरोडा) येथील मूळ रहिवासी आहेत. सध्या ते गोंदिया मुक्कामी असून आई वडील दोन्ही जिल्हा परिषद शिक्षक आहेत. डॉ. युगल चे प्राथमिक शिक्षण इंदिराबेन प्राथमिक शाळा, कुडवा येथे झाले असून इयत्ता 6 वी ते 10 पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय नावेगावबांध येथे झाले आहे. इयत्ता 11 वी व 12 वी चे शिक्षण मॉडर्न कॉलेज पुणे येथून झाल्यावर जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथून त्यांनी एमबीबीएस केले. असून पहिल्याच प्रयत्नात भारतातील सगळ्यात कठीण समजली जाणारी परीक्षा पास केली आहे. याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाने हे यश प्राप्त झाले असे त्याचे म्हणणे आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, मार्गदर्शक आणि परिवारातील लोकांना दिले आहे.

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल डॉ. युगल चे अभिनंदन वडील के.आर. कापसे, आई गायत्री कापसे, भाऊ अभिषेक कापसे, संजयकुमार कापसे, एल. आर. कापसे, अजय कापसे, डॉ. लोकेश चिरवतकर, टेकराम चिरवतकर, श्रीमती संगीता चिरवतकर, मंगला चिरवतकर, चंद्रकुमार कोसरकर, संदीप जांभुळकर, वशिष्ठ खोब्रागडे, व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.