RTEच्या नावावर शिक्षण विभाग उठले कायम विनाअनुदानित शिक्षकांच्या नोकरीवर

0
11

गोंदिया-केंद्र सरकारने सर्वांना शिक्षण हक्क कायदा लागू केला त्याचा आधार घेत गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये इयत्ता ५ वी व इयत्ता आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला.यात तीन किलोमीटरच्या आत शाळा असल्यास सुरु करता येणार नाही या अटीचे पालन करण्यात येत असल्याचा कांगावा करीत कायम विनाअनुदानित शाळेत गेली १०-१५ वर्ष विनावेतन नोकरी करणाèया शिक्षकांच्याच नोकरीवर घाला घातला आहे.खासगी शाळेतील शिक्षक घरी बसले तरी चालतील अशी भूमिका सध्या घेतल्याने गोंदिया जिल्ह्यात कायम विनाअनुदानित तत्वावर गेली अनेक वर्षापासून नोकरी करणारे विनपगारी शिक्षक पगारी केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षकामुळे बेरोजगार होणार आहेत.
आम्ही उत्कृष्ठ शिक्षण देण्यासाठी सज्ज असल्याचा qढढोरा पिटला जात आहे.यासाठी काही शाळामधील मुख्याध्यापक राजकीय बळावर विद्याथ्र्यांचे शाळा सोडल्याचा दाखला थांबवून आमच्याच शाळेत वर्ग सुरु करत असल्याचे सांगत आहेत.कधी शाळेत वेळेवर हजर न राहणारे केंद्रप्रमुख आरटीईचा दाखला देत बसले. परंतु ज्या शाळेचे नाव केंद्रशाळा आहे त्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची वेळ त्यांच्याकडे नाही. ते केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक आरटीईची गोडवे गायला लागले आहे. सर्वांना शिक्षणच द्यायचे आहे तर कशाला तीन किलोमीटरची अट हवी.जिथे जिल्हा परिषदेच्या शांळाना इयत्ता ७ वी चे वर्ग आहेत. त्या प्रत्येक शाळेत इयत्ता ८ वी चे वर्ग सुरु करण्याचा धाडसी निर्णय शिक्षण विभागाने घ्यायला हवा.