सभापतींच्या भेटीत भरनोलीची शाळा कुलूपबंद

0
6

दोषी शिक्षकांवर कारवाई होणार : वरिष्ठांकडे पाठविला प्रस्ताव
संतोष रोकडे
अर्जुनी मोरगाव/ इटखेडा, दि. ३ : अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी २८ जुलैला भरनोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. या वेळी शाळा चक्क कुलूपबंद असल्याचे दिसले. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी दोषी शिक्षकांवर कारवाई करावी, असा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. खुद्द शिक्षकांनींच शिक्षणाचा खेळ मांडल्याचे तालुक्यात दिसून येते. तथापि, याच माहितीच्या आधारावर सभापती अरविंद शिवणकर यांनी २८ जुलै रोजी सायंकाळी सव्वाचारला भरनोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट दिली. या वेळी शाळा कुलूपबंद असल्याचे दिसले. दरम्यान, त्यांनी तत्काळ गावकèयांकडे चौकशी केली. गावकèयांनी सकाळपासूनच शाळा बंद असल्याचे सांगितले. त्याचप्र‘ाणे राजोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही भेट दिली. सहायक शिक्षक रवींद्र दाणी व डी. डी. वंजारी हे अनुपस्थित आढळले. मुख्याध्यापक गहाणे हे शाळेत नव्हते. शाळेच्या वेळेत मुख्याध्यापक व दोन साहायक शिक्षक हलचल रजिस्टरवर कसलीही नोंद न करता शाळेतून निघून गेले. या बाबत सभापती शिवणकर यांनी गंभीर दखल घेतली असून, दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई करावी, असा प्रस्ताव त्यांनी वरिष्ठांकडे पाठविला आहे. वरिष्ठ आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.