27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक श.जा.ति.हायस्कुलचे प्रा.महेंद्र सोनेवाने यांचा सेवापूर्ती सत्कार

श.जा.ति.हायस्कुलचे प्रा.महेंद्र सोनेवाने यांचा सेवापूर्ती सत्कार

0
78

गोरेगाव,दि.०३ःशहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगांव येथे दिनांक 01/10/ 2025 रोजी महेंद्र सोनेवाने प्राध्यापक यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार सोळावा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या आदर्श शिक्षकांबद्दल सुखदुःखात चांगल्या गोष्टींच्या आठवणींना उजाळा देण्याचा काम कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आपले सहकारी मित्र सेवानिवृत्त होत असताना कनिष्ठ महाविद्यालयात ते शाळेत नसताना कशी कमी भासेल व त्यांच्यासोबत घालवलेले वेळ कसे अविस्मरणीय होते या संदर्भात मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गोरेगाव कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील हरीणखेडे, साखरीटोला महाविद्यालयाचे प्राचार्य जी. जे. परदेशी , कट्टीपार महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक दिलीप राहगंडाले, सुभाष महारवाडे सर, प्रभाकर रांगडाले, कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापिका गोतमारे मॅडम या सर्वांनी सेवानिवृत्ती कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. एस. बी कटरे, श्री अंबादेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सरांचा विस्तृत परिचय कटरे सरांनी नोकरीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कार्यक्रमात प्रस्तुत केले. काही काळ सेवानिवृत्त होत असताना गेटवर असणाऱ्या मावशीने भावनिक वातावरण निर्माण केला त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. सोनवणे सरांनी सेवानिवृत्ती पर भाषण कार्यक्रमात आयुष्याची सुरुवातीची नोकरी ककोडी पासून सुरुवात करून गोरेगाव पर्यंत आणून सोडले.आयुष्याच्या 58 वर्षाच्या काळात कार्यकाळात घडलेल्या सर्व सुख – दुःख आनंददायी गोष्टींना उजळा दिला जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय गोरेगावच्या सर्व सहकारी मंडळींनी महेंद्र सोनवणे,यशोधरा सोनवणे त्यांचे पुत्र दीपेश सोनवणे सोबतच मुलगी श्रुती सोनवणे सत्कार करून सदिच्छा भेटवस्त वस्तू देऊन सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा समारंभ थाटात पार पडला. कार्यक्रमात आभार प्रदर्शन शिंदे सर यांनी केले. सेवानिवृत्ती सत्कार सोहळा व निरोप समारंभ अत्यंत चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने जिल्हा परिषद गोरेगाव चे प्राचार्य हरिणखेडे  यांनी आयोजित केले. या कार्यक्रमात शाळेचे कॉन्व्हेंट पासून तर बारावी पर्यंत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.