26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक राष्ट्रीय-राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक संघाची नागपूर विभागीय कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रीय-राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक संघाची नागपूर विभागीय कार्यकारिणी जाहीर

0
125

नागपूर-राष्ट्रीय-राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य नागपूर विभागीय कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, ही घोषणा ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली. ही बैठक राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य प्रतिनिधी दिलीप केने, माया गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
नवीन कार्यकारिणीत विभागीय अध्यक्षपदी शुभांगी पोहरे यांची निवड करण्यात आली आहे. विभागीय उपाध्यक्ष सचिन चव्हाण, विभागीय सरचिटणीस राजकुमार तिरभाने, तर विभागीय कोषाध्यक्ष दिनेश कुमार अंबादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विभागीय सल्लागार सुनील कोडापे आणि मंजुषा नंदेश्वर यांची निवड झाली आहे.
याशिवाय, विभागीय कार्याध्यक्ष धनराज काळे, विभागीय प्रसिद्धी प्रमुख एन. बी. बिसेन, विभागीय संपर्क प्रमुख प्रवीण मुंजमकर, विभागीय संघटक खुशाल डोंगरवार आणि विभागीय सहसचिव प्रा. युवराज खोब्रागडे यांचीही निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर तसेच राज्य कार्यकारिणीने सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीमुळे शिक्षक संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळून शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.