परशुराम विद्यालय मोहगाव(बु.)मध्ये अपुर्व विज्ञान मेळावा

0
11

गोरेगाव,दि.17- तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथे दि. १६ ते  १७ नोव्हेंबरला दोन दिवसीय अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याचे उदघाटन दवडीपार केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.भगत यांच्या हस्ते आणि शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु. कटरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.शालेय विध्यार्थ्यानी स्वंय प्रेरणेतून तयार केलेले २० माँडल ठेवण्यात आले.वरिष्ठ प्राथमिक शाला मोहगाव बु.येथील विद्यार्थ्यानी व शिक्षकानी भेट दिली.तसेच गावातील पालकांनी भेट देवून विद्यार्थ्याचे कौतुक केले. शाऴेतील विज्ञान शिक्षक पी.एम.चुटे, भारती बिसेन ,एल.वाय.पटले यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.विज्ञान मेऴाव्याचा समारोप आज दि.१७ ला करण्यात आले.या कार्यक्रमात सर्व  डी.डी.चौरागडे,टी.एफ.ईडपाचे, व्ही.एस.मेश्राम, बी.सी.गजभिये,पी.व्ही.पारधी,के.बी.785bf128-c8d2-4783-b8b0-a2c50915ef18पारधी, एल.आय.बोपचे,दिनेश बोपचे यांनी सहकार्य केले.