एनएमसी विरोधात डाॅक्टरांचा मोर्चा

0
17

गोंदिया,दि.17 : आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रव्यापी आयएमए सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने वचनपूर्तीची हमी मागे घेण्यात आली. सातत्याने पाठपुरावा करूनही आतापर्यंत वचनपूर्ती करण्यात आली नाही, उलट शासनाने एमसीआय बरखास्त करून त्याऐवजी एनएमसी (नॅशनल मेडीकल कमिशन) नेमण्याचा घाट रचल्याने आज बुधवारी वैद्यकीय व्यावसायिकांनी गोंदियाच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. या मोर्चात आयएमएचे अध्यक्ष डॉ. आभा सोनकिया, माजी अध्यक्ष डॉ. घनश्याम तुरकर, डॉ. लक्ष्मी गुप्ता, डॉ. राजेंद्र जैन, डॉ. अशोक चौरसिया, डॉ. मोहन, डॉ.सुधीर जोशी, डॉ. उमेश शर्मा, डॉ.चिटणवीस, डॉ. पाली बग्गा, डॉ. कोतवाल, डॉ. लता जैन, डॉ. राणा व इतर डॉक्टर उपस्थित होते.
वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया यांनी या मोच्र्याला हिरवी झेंडी दाखवून मोच्र्याची सुरूवात केली. बुधवार सकाळी ११ वाजता केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातून या मोच्र्याला सुरूवात करण्यात आली. मोर्चा केटीएस, नेहरू चौक, जमनालाल बजाज पुतळा, गोरेलाल चौक दुर्गा चौक, नगर परिषद, गांधी प्रतिमा होत पोलीस ठाणे मार्ग गोरेलाल चौकातून ही रॅली केटीएस मध्ये पोहचली. गोंदियातील सर्व डॉक्टर या रॅलीत सहभागी झाले होते.
एमसीआय ही मॉडर्न मेडीसिनची नियामक स्वायत्त संस्था असून त्यात लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सभासदांसोबतच काही सरकारी नामनिर्देशित सभासद असतात. एनएमसीमध्ये (नॅशनल मेडीकल कमिशन) केवळ सरकारी नामनिर्देशित सभासद राहणार असून त्यातही ६0 टक्के प्रतिनिधी गैरवैद्यकीय क्षेत्रातील राहणार आहेत. सरकारी एकाधिकार असणार्‍या एनएमसीची स्थापना लोकशाहीला गालबोट आहे. वैद्यकीय शिक्षण व सेवा धोक्यात आणण्याचा निर्णय असल्याचा आरोप करण्यात आला आहे.