कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

0
12

गडचिरोली,दि.17-gadchiroli_vilas_dhoreमागील २० वर्षे काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद सांभाळणारे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास ढोरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. १८ डिसेंबर रोजी देसाईगंज नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून भाजपतर्फे दररोज संध्याकाळी प्रत्येक वॉर्डात जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. काल तुकुम वॉर्डात आयोजित जनसंवाद मेळाव्यात विलास ढोरे यांनी काँग्रेसला रामराम करुन भाजपात प्रवेश केला. यावेळी गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, नगर परिषद उपाध्यक्ष मोती कुकरेजा, नाना नाकाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विलास ढोरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एनएसयूआयपासून केली. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. मागील २० वर्षांपासून ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते. परंतु सहा महिन्यांपूर्वी पक्षाने त्यांची तालुकाध्यक्षपदावरुन उचलबांगडी केल्याने ते नाराज होते. तरीही त्यांनी पक्ष सोडलेला नव्हता. नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून उभे राहण्याची त्यांची इच्छा होती. परंतु काँग्रेस नेत्यांची नकारात्मक भूमिका लक्षात आल्याने काल त्यांनी भाजपात प्रवेश केला.