गोंदियाच्या केंद्रीय विद्यालयाला हवी १० एकर जागा

0
7

खेमेंद्र कटरे
गोंदिया,berartimes.com,दि.20-केंद्रसरकारच्या मानव संशाधन व मनुष्यबळ मंत्रालयाच्यावतीने देशातील १५० जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय मंजूर करण्यात आले असून महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचा सुध्दा यात समावेश आहे.या केंद्रीय विद्यालयात शासकीय नोकरदारापासून ते सर्वसामान्यांच्या मुलांना प्रवेश मिळणार आहे.
भंडारा येथील जवाहरनगर स्थित केंद्रीय विद्यालयाचे प्रशासन कार्यान्वित झाले असून गोंदिया येथे केंद्रिय विद्यालय सुरु करण्यासाठी १० एकर जागेचा शोध सुरु झाला आहे.शिक्षणाच्या क्षेत्रात नक्षलग्रस्त,आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यासाठी हे विद्यालय सेमीअर्बंन म्हणून मंजुर झाले आहे.
देशातल्या १५० जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला केंद्रीय विद्यालय नव्हते अशा ठिकाणी हे विद्यालय मंजुर करण्यात आले आहे.यामध्ये गोंदियाचा समावेश सुध्दा आहे.आधीपासूनच केंद्रसरकारच्या अंतर्गत असलेले नवोदय विद्यालय हे नवेगावबांध येथे सुरु आहे.त्यातच आत्ता नवे केंद्रीय विद्यालय मिळाल्याने खेड्यापाड्यातीलच नव्हे तर आदिवासी भागातील विद्याथ्र्यांना महागड्या सीबीएसईच्या शांळाएैवजी शासनाच्याच शाळेतून कमी पैशात सीबीएसईचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.
गोंदिया येथे हे केंद्रीय विद्यालय सुरु करण्यासाठी भंडारा येथील जवाहरनगर केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती.त्यानुसार जवाहरनगर केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य महिपाल आणि त्यांच्या चमूने (दि.१९)गोंदिया येथे येऊन जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे यांची भेट घेऊन केंद्रिय विद्यालय सुरु करण्यासंदर्भात चर्चा केली.तसेच विद्यालयासाठी गोंदिया शहराच्या परिसरात सुमारे १० एकर जागा हवी असल्याची माहिती दिली.या चर्चेमध्ये गोंदिया शहराच्या लगत शासकीय जागेचा त्वरीत शोध घेऊन अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी बेरार टाईम्सला दिली.

मानवसंधाशन मंत्रालय करणार नोकर भरती
या केंद्रिय विद्यालयासाठी जो काही स्टाप लागणार आहे,त्या पदाची भरती मानव संशाधन व मनुष्यबळ मंत्रालयातर्गत येत असलेले केंद्रीय विद्यालय संघटन हे देशपातळीवर करणार आहे.सुरवातीला नजीकच्या केंद्रीय विद्यालयातील शिक्षक वर्ग प्रतिनियुक्तीवर पाठवून ही केद्रीय शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला जातो.

सुसज्ज व्यायामशाळेसोबतच प्रयोगशाळा
नव्याने सुरु होणाèया केंद्रीय विद्यालयामध्ये सर्व विद्याथ्र्यासांठी सुसज्ज अशी व्यायामशाळा राहणार आहे.सोबतच इयत्ता १ ते ५ पर्यंतसाठी एक,इयत्ता सहा ते १० वी पर्यंतसाठी एक आणि इयत्ता ११ ते १२ वी साठी एक अशा तीन स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा राहणार आहेत.आरटीईमधील प्रवेश घेतलेल्या मुलांना निशुल्क शिक्षण मिळणार तर बीपीएलमधील मुलांना नाममात्र प्रवेश शुल्क लागणार आहे.सोबतच शासकीय कर्मचाèयांच्या मुलांनाही नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.

केंद्रीय विद्यालयासाठी टीबी हॉस्पीटलची जागा पर्याय
गोंदिया येथे नव्याने सुरु होणाèया केंद्रीय विद्यालयासाठी १० एकर जागेची गरज आहे.एवढी मोठी जागा शासकीय सध्यातरी शहरानजीक कुठेच दिसून येत नसल्याने जुने टी.बी.हॉस्पीटलची जागा ही एक पर्यायी जागा होऊ शकते.कारण ही जागा सुमारे 17 एकर असून न्यायालयात ज्या संतोष रहागंडाले यांनी याचिका टाकली त्यांनी गोंदिया शिक्षण संस्थेला जागा देण्याएैवजी शासकीय योजनासांठी जागा वापरण्यास आपली सहमती असल्याचे आधीच म्हटले आहे,त्यामुळे जिल्हाप्रशासनाने पुढचे पाऊल उचलल्यास शहराला लागून आणि सर्वसुविधाजनक ही जागा असल्याने जिल्हाप्रशासनाने ही जागा शिक्षणाचा दृष्टीकोन समोर ठेऊन न्यायालयाकडे परवानगी मागितल्यास चांगले विद्यालय शहराच्या भागात आकारले जाऊ शकते.
Attachments area