प्रजासत्ताक दिनी १३0३ शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा

0
13

गोंदिया,दि.२५:स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताकदिन येत्या शुक्रवारी(दि.२६) साजरा होणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागांना २१ जानेवारी रोजी पत्र पाठविण्यात आले. या उपक्रमात जिल्ह्यातील १३0३ शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. परंतु, ही परीक्षा ऐच्छीक असल्याने त्याचबरोबर सुटीच्या दिवशी आल्यामुळे आणि विशेष म्हणजे या परीक्षेत कसल्याही प्रकारचे बक्षीस ठेवण्यात आले नसल्यामुळे शिक्षण विभागाचा हा प्रयोग फसण्याची शक्यता अधिक आहे.
राष्ट्र ही संकल्पना मोठी आणि सर्वात महत्त्वाची आहे. भारतात प्रमुख दोन राष्ट्रीय सण आहेत. त्यातील एक म्हणजे, स्वातंत्र्य दिवस आणि दुसरा सण प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताकदिनी स्वतंत्र भारताला स्वत:ची आदर्श अशी राज्यघटना मिळाली आणि ती अस्तित्वात आली.या दिवशी ्रपत्येक शासकीय,निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या दिवसाचे महत्त्व अधिक दृढ व्हावे, या दृष्टिकोनातून राज्याच्या शिक्षण विभागाने दोन पाऊल पुढे टाकले. त्यांतर्गत राज्यातील सीबीएसईसह सर्व प्राथमिक शाळांमध्ये २६ जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्ह्यात शासकीय आर्शमशाळा, जिल्हा परिषद, खासगी अशा एकूण १३0३ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. संबंधित निर्णय २१ जानेवारी रोजी घेण्यात आला. त्यासंदर्भात शिक्षण संचालनालयाने प्रत्येक जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाने पत्रव्यवहार केला आहे. मात्र, हा निर्णय घेताना विभागाने परीक्षेत बसणे अनिवार्य आहे, की ही परीक्षा ऐच्छीक आहे, याचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे देखील या निर्णयांची अंमलबजावणी किती शाळा करतील, ही देखील शंका आहे.