देवरी येथे झूलोजिकल  सोसाइटीची स्थापना

0
15

देवरी दि.७- स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे  विषयाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच प्राचार्य डॉ देवेंद्र बिसेन व् विभाग प्रमुख डॉ सुधीर भांडारकर  यांच्या मार्गदर्शनाखाली झुलोजीकल सोसाइटी ची स्थापना करण्यात आली.
प्रमुख पाहुने म्हणून डॉ गोपाल पालीवाल जैस्वाल महाविद्यालय अर्जुनी/मोर उपस्थित होते . जागतिक कीर्तिचे पक्षी संशोधक डॉ सलीम अली यांच्या प्रतिमेचे अनावरण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ही प्रतिमा विद्यार्थिन्नी प्राणीशास्त्र विभागले दिलेली भेट होय.   डॉ पालीवाल यांनी सांगितले की सृष्टितील प्राण्यांच्या अधिवासाचे अस्तित्व संवर्धन करने गरजेचे कसे आहे यावर प्रकाश टाकला. प्रा भास्कर डोंगरे यांनी पर्यावरणाचे महत्व विषद केले. प्रा आशीष गाडवे यांनी जूलॉजिकल सोसायटीचे महत्व स्पष्ट केले. उपप्राचार्य प्रा जयपाल चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वक्तयांचा व्याक्यांनांचा पुरस्कार केला व् सदर उपक्रमाचे मुक्त कंठाने कौतुक केले, ते म्हणाले की सदर उपक्रम हे देवरी सारख्या आदिवासी बहुल क्षेत्रातील विध्यार्थाकरिता मैलाचा दगड ठरेल.
कार्यक्रमा दरम्यान ‘झूचाईमस्’ या मैग्ज़िनचे प्रकाशन करण्यात आले, यात विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या काही निवडक लेखांचा समावेश आहे. या मैग्ज़ीन मधील सर्वोत्कृष्ठ लेखन करीता गायत्री डोंगरावर, उर्वशी देशमुख, व् मिनल मेश्राम यांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.  सोसाइटी अंतर्गत उपक्रम या हेतुने डॉ गोपाल पालीवाल यांनी पावर पॉइंट च्या माध्यमाने सापांचे विश्व या विषयाचे सादरिकरन केले. डॉ सुधीर भांडारकर यांनी प्रास्ताविक व् झुलोजीकल सोसायटी चे उद्देश्य स्पस्ट केले व् सर्व सभासदांचे अभिनन्दन केले. संचालन जसलीन कौर भाटिया व् आभार प्रदर्शन श्वेता मनगटेनी केले. २०१६-२०१७ यावर्षीची कार्यकारिणी मधे , अध्यक्ष जसलीन कौर, उपाध्यक्ष निधि जैन, सचिव शीतल गुरनुले, कोषाध्यक्ष जागेश मार्गाये व् अनेक सभासदांचे डॉ भांडारकरानी अभिनन्दन केले. हे उपक्रम यशश्वी करन्याकरिता सारंग देशपांडे, सुबोध देशपांडे व् दत्तू कागदे यांनी परिश्रम घेतले.