विधान परिषदः परिचारकांच्या निलंबनासाठी सर्वपक्षीय सदस्य सरसावले

0
9

मुंबई – विधानपरिषदेतील सदस्य प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी काढलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे त्यांचेवर सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. विधान परिषदेत परिचारक यांच्या तत्काळ निलंबनासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय सदस्य सरसावल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
विधानपरिषदेचे सदस्य असलेल्या प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. यामुळे विधानपरिषद सभागृहाचाच एकप्रकारे अवमान झाला असून अशा सदस्यांना तत्काळ निलंबित करावं, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर या आमदाराला फासावर द्या, असं म्हणाले असते, असं सांगत शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

सैनिकांबद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदाराला ठोकणार : उदयनराजे
‘आमदार असू दे नाहीतर कोणी, त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार’ अशा भाषेत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही परिचारक यांच्यावर सडकून टीका केली आहे.