शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञानही मिळवा – कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर

0
10

अमरावती,दि.१५ :वर्तमानकाळात अभ्यासक्रमातील शिक्षण विद्याथ्र्यांनी घेवून चालणार नाही, तर शिक्षण घेत असताना व्यावसायिक ज्ञानही मिळवायला हवे.  ‘बिझिनेस प्लॅन’ सारखे उपक्रम अशा प्रकारचे ज्ञान मिळण्यास उपयुक्त ठरतात. अशा उपक्रमांमधून विद्याथ्र्यांनी ज्ञान मिळवून नोकरी करणारे न बनता नोकरी देणारे उद्योजक बना असे मत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले. विद्यापीठाचा एम.बी.ए. विभाग व प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अॅन्ड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘बिझिनेस प्लॅन’ स्पर्धा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्याथ्र्यांसाठी विद्यार्थी भवनात आयोजित करण्यात आली,  त्याचे उद्घाटन करताना कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी.एन. शिंगाडे, बी.सी.यु.डी. चे माजी संचालक डॉ. राजेश जयपूरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एस. अली व एम.बी.ए. विभागप्रमुख डॉ. संतोष सदार उपस्थित होते.
‘‘ एक्झरसाइझिंग फॉर युअर स्टार्ट-अप्स’’ ही थीम स्पर्धेकरिता ठेवण्यात आली.  स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा सर्वप्रथम कुलगुरुंनी केली.  उद्योगाला कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून ती पूर्ण करण्यासाठी विद्यापीठामध्ये अकरा कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरु केल्याची माहिती कुलगुरुंनी दिली.  ते पुढे म्हणाले, विद्याथ्र्यांनी अभ्यासक्रमापुरते ज्ञान मिळविणे पुरेसे नसून शिकता शिकता व्यावसायिक ज्ञान प्राप्त करणे गरजेचे झाले आहे.  केवळ पदवी        पाहून रोजगार मिळणार नाही, तर विद्याथ्र्यांमधील कुशलता उद्योजकांकडून पाहिली जाते.  म्हणून विद्याथ्र्यांनी आपल्यातील कुशलता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.  विद्याथ्र्यांना मौलिक संदेश देतांना ते म्हणाले, स्वत:वर प्रेम करा, स्वत:ला ओळखा आणि आपला आत्मवि·ाास जागृत करुन स्वत:ला कुशल बनवा.
भारत तरुणांचा देश आहे, तरुणांना उपयोगी असलेली शिक्षण पध्दती आम्हाला विकसीत करावयाची असून आयोजित उपक्रम ही त्याची पहिली पायरी असल्याचे सांगून कुलगुरु म्हणाले, नामवंत उद्योजकांचे विचार, अनुभव आणि उद्योजक होण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आदी बाबतचे मार्गदर्शन उद्योजकांकडून विद्याथ्र्यांना मिळणार असल्यामुळे त्यांनी  त्यापासून बोध घेवून स्वत:ला कुशल बनवावे असेही कुलगुरुंनी सांगितले.विदर्भ अविकसित प्रदेश राहिला असून त्याला विकसित करण्याचा विडा मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री ना.श्री. नितीन गडकरी यांनी उचलला असल्याचे सांगून डॉ. नितीन धांडे म्हणाले, विदर्भात आता सुगीचे  दिवस आले आहेत.  अनेक उद्योग या भागात येत आहेत.  त्यामुळे विद्याथ्र्यांच्या रोजगारांच्या संधीत वाढ होत आहे .  अथक परिश्रम घेवून आपला उद्योग यशस्वी केलेल्या उद्योजकांचे मार्गदर्शन विद्याथ्र्यांना लाभणार असल्यामुळे आमचे विद्यार्थी सुद्धा यशस्वी उद्योजक बनतील, त्यासाठी परिश्रम घेतील असेही ते म्हणाले. यावेळी एम.बी.ए. विभागप्रमुख डॉ. संतोष सदार व माजी बी.सी.यु.डी. संचालक डॉ. राजेश जयपुरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.सल्लागार समितीचे श्री. धनंजय धवड, श्री. सूर्यकांत अंबाडेकर, डॉ. डी.एन. शिंंगाडे, डॉ. राजेश जयपूरकर, उद्योजक श्री. राजेश कोरपे, श्री. महेश रेड्डी, श्री. प्रसाद कोकीळ, श्री. सतिश चिंचोरकर, डॉ. नितीन धांडे यांचे शॉल-श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुस्तक देऊन कुलगुरुंनी तर डॉ. संतोष सदार यांनी कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा यावेळी सत्कार केला.
विद्यापीठ गीताने व संत गाडगे बाबांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.  प्राचार्य डॉ.एम.एस. अली यंानी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक भाषण केले.  दोनशेपेक्षा जास्त विद्याथ्र्यांनी नोंदणी करुन या स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद दिला.  संचालन युसरा सिद्दीकी व पियुष मडके यांनी तर आभार प्रा.पी.ए. खोडके यांनी मानले.  उद्घाटन कार्यक्रमाला एम. बी.ए. विभागाचे डॉ. दिपक चाचरकर, प्रा. सचीन गायकवाड,  विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. गणेश मालटे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, श्री. नितीन काकाणी, डॉ. डी.जी. हरकुट, डॉ. एस.बी. मोहोड, श्री. पी.एस. चौधरी, श्री. पी.व्ही. खांडवे या शिक्षकांसह बडनेरा महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.