शिक्षकांच्या समस्यांना घेऊन शिक्षक समितीचा आंदोलनाचा इशारा

0
11

गोंदिया,दि.१७(berartimes.com)-जिल्हा परिषदेतंर्गत येणाèया प्राथमिक व माध्यमिक शाळातंील शिक्षकांच्या समस्यांना घेऊन तसेच उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने सकाळपाळीत शाळा सुरु करण्यासह वेतनाचे प्रश्न सोडविण्याच्या मागणीला घेऊन गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.१६ मार्च रोजी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी वउपकोषागार अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागंण्याचे निवेदन सादर केले.तसेच २२ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसमोर एकदिवसीय आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र दिले.शिक्षकांचे वेतन विनाविलंब अदा करण्यात यावे,स्वयंपाकी मानधन त्वरीत देण्यात यावे.शाळा सकाळ पाळीत सुरु करण्यात यावे.शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्याकरीताच शासन निर्णयातील मुद्यांच्या अनुषंगाने बदली प्रकिया पारदर्शक करण्यासाठी मंत्रालयातून मार्गदर्शन मागविण्यात यावे.१ जाने.२००६ च्या सुधारीत वेतननिश्चितीनुसार किमान टप्यावर सुधारीत वेतननिश्चिती करण्याची कारवाई करण्यात यावी आदी मागण्याचा समावेश होता.शिष्टमंडळाता जल्हाध्यक्ष मनोज दिक्षित,जिल्हा सरचिटणीस एल.यु.खोब्रागडे,किशोर डोंगरवार,विनोद बडोले,संदिप तिडके,बी.आर.दिप,कैलास हाडगे,विठोबा रोकडे,एच.बी.बहेकार,गणेश चौहान आदी पदाधिकारी उपस्थित होते.