बिरसीच्या विद्यार्थ्यांनी पेटवली कचर्‍याची होळी

0
8

आमगाव,दि.१७:-आमगाव पंचायत, समितीअंतर्गत प्राथमिक शाळा बिरसी येथे शाळेच्या परिसराचा तसेच गावातील केरकचरा एकत्र करून विद्यार्थ्यांनी कचर्‍याची होळी पेटवून हा सण साजरा केला.
प्राचीन काळापासून होळी हा सण साजरा करण्याची प्रथा व परंपरा या देशात सुरू आहे. होळीसाठी वृक्षकटाई करून आणलेले लाकूड जाळल्या जातात. यामुळे लाखो टन लाकडे जाळून पर्यावरणाचे नुकसान केले जाते व वृक्षांची कत्तल केली जाते. परंतु, शाळेच्या विद्यार्थ्यांनी आजू-बाजूच्या परिसराचा केरकचरा जमा करून होळी उत्सव साजरा केला . लाकडाच्या बचावाचे महत्व या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एल.यु. खोब्रागडे यांनी सांगितले. तसेच होळी दहनाच्या माध्यमातून आपल्या मनातील वाईट दहनाच्या त्यागून द्यावे ,असे विचार जैपाल ठाकूर, विकास लंजे यांनी व्यक्त केले.या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश पटले, ममता पटले, मीरा खुळसुंगे अनिता पंधरे, प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनीही समयोचित मार्गदर्शन करून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एल.यु. खोब्रागडे, वर्षा बावनथडे विकास लंजे, जैपाल ठाकूर व सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.