जात पडताळणी प्रस्ताव त्रुटींची पुर्तता करावी

0
10

गोंदिया,दि.२० : जिल्हा जात प्रमाणपत्र समिती गोंदिया अंतर्गत सर्व अर्जदारांना कळविण्यात येते की, व्यावसायीक अभ्यासक्रम, सेवा, निवडणूक व इतर संबंधी ज्या अर्जदाराचे जात पडताळणी प्रस्ताव त्रुटी कारणास्तव प्रलंबीत आहेत अशा अर्जदारांनी त्रुटींची पूर्तता दर सोमवारला तसेच शैक्षणिक (१२ वी विज्ञान) अर्जाच्या त्रुटीची पूर्तता दर शुक्रवारला करण्यात येईल. इतर दिवशी अर्जदारांच्या त्रुटीचा विचार केला जाणार नाही, याची संबंधित अर्जदारांनी नोंद घ्यावी. असे उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्यांनी कळविले आहे.