संस्थाचालक डोंगेरेच्या विरोधात विद्याथ्र्यांचे आंदोलन

0
19

मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न
गोरेगाव,दि.२२-तालुक्यातील हिराटोला येथे बहुजन हिताय शिक्षण संस्थेद्वारा मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय चालविण्यात येत आहे.या महाविद्यालयाचे संस्थापक डोंगरे यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप विद्याथ्र्यांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार या कृषी महाविद्यालयात १११ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना अंतिम वर्षाच्या परिक्षेच्यावेळी शैक्षणिक शुल्क जमा करा अन्यथा नापास करण्याचा इशारा देण्यात आल्याने हे प्रकरण समोर आले.या प्रकरणाची तक्रार पिडीत विद्याथ्र्यांनी एनएसयुआयकडे केल्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्यात यासंबधी तक्रारही दाखल करण्यात आली.
२०१३ मध्ये पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या १११ विद्याथ्र्यांना स्पॉट एडमिशन देण्यात आले.स्पॉट एडमिशन असलेल्या विद्याथ्र्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येत नसल्याचे शासनाने शासन निर्णय काढल्याने त्यानुसार त्या विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीचे देयके समाजकल्याण व कोषागार कार्यालयाने नाकारले.परंतु याची वास्तविक माहिती विद्याथ्र्यांना न देता त्यांचे प्रवेश सुरुच ठेवले.प्रथम सत्राचे शुल्क ५० हजार रुपये असताना शिष्यवृत्ती गृहीत धरुन शुल्क २५ हजार रुपये आकारले.मात्र शिष्यवृत्ती फेटाळल्याची माहिती मिळाल्यावर विद्यार्थी कृषी महाविद्यालय सोडून जातील या भितीने संस्थाचालक व प्राचार्यांनी माहिती लपवित तीन वर्ष विद्याथ्र्यांना कळूच दिले नाही.शेवटच्या वर्षाची जेव्हा परिक्षा आली,तेव्हा मात्र विद्याथ्र्याकडून प्रवेश शुल्काची मागमी करीत न दिल्यास नापास करण्याची धमकी देण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.यावरुन गोंदिया जिल्ह्यातही शिष्यवृत्तीच्या नावावर काही शिक्षण संस्थाचालक कसे फसवणुक करतात हा प्रकार उघडकीस आला आहे.