जेएनयू आणि जाधवपूर विद्यापीठ संशोधनामुळे अव्वल

0
7

नवी दिल्ली दि.5-– दर्जेदार शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांच्या केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीच्या यादीत पहिल्या दहांमध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू (जेएनयू) आणि जाधवपूर विद्यापीठाला स्थान मिळाले असून त्यांना हे स्थान अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे नव्हे तर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनामुळे मिळाल्याचा टोला, केंद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मारला.सोमवारी देशातील सर्वोत्तम उच्च शैक्षणिक संस्थांची यादी प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केली.