सीबीएसई 12वी परीक्षेत मुलीच अव्वल, नोएडाची रक्षा देशात प्रथम

0
11
नवी दिल्ली दि.२८ मे- मोठ्या प्रतिक्षेनंतर रविवारी सीबीएसई 12 वी परीक्षेचे निकाल जाहीर झाले. नोएडा येथील एमिटी इंटरनॅशनल शाळेची विद्यार्थीनी रक्षा गोपाल हिने 99.6% गुणांसह देशात अव्वल क्रमांक मिळवला आहे. चंदीगडची भूमी सावंत (99.4%) द्वितीय क्रमांकवर राहिली आहे तर, चंदीगडचाच आदित्य नैना आणि मन्नत लुथरा यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे. 9 मार्च 2017 ते 29 एप्रिल 2017 दरम्यान झालेल्या परीक्षेत देशभरातून 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. यंदा 82% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मागील वर्षी हा आकडा 83.05% होता.सीबीएसईच्या 12वी परीक्षाचा निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in येथे पाहाता येणार आहे.एमिटी शाळेची विद्यार्थीनी रक्षा 99.6% गुणांसह देशात पहिली आली आहे. मागलीवर्षी देखील मुलींनीच बाजी मारली होती.