अभियांत्रिकी व औषधनिर्माण सामाईक (एमएचटी – सीईटी)प्रवेश परीक्षेचा निकाल 3 जूनला

0
19

मुंबई, दि. 2 : अभियांत्रिकी व औषधनिर्माण सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल 3 जून 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या  https://www.dtemaharashtra.gov.in/mhtcet2017 या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत, शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता
अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा “एमएचटी-सीईटी  २०१७”  ही गुरुवार, दिनांक ११ मे, २०१७ रोजी घेण्यात आली होती.
सदर प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण ३ लाख ८९ हजार ५२० पैकी ३ लाख ७६ हजार २८२ (९६.६०%) उमेदवार परीक्षेकरिता उपस्थित होते. वरील संकेतस्थळावरून उमेदवारांना आपले स्कोअर कार्ड डाउनलोड करता येईल, अशी माहिती आयुक्त व सक्षम प्राधिकारी, राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्ष, मुंबई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.