ग्रामगीता जीवन विकास परिक्षेवर मार्गदर्शन

0
11

गोरेगाव,दि.08- येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा व ग्रामगीता जीवन विकास परीक्षेवर मार्गदर्शन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बिसेन होते.यावेळी ग्रामगीताचार्य जी.एफ.बघेले,केंद्रप्रमुख आर.एस.रहांगडाले,गुरूदेव सेवा मंडल गोरेगांवचे सोनवाने महाराज, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.ग्रामगीताचार्य परिक्षेतील सर्व गटातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करण्याऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा पुष्पगुच्छ,मेडल,प्रार्थना पुस्तक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सर्व अतिथिंनी व अध्यक्षांनी संबंधित विषयावर प्रेरणादायक मार्गदर्शन केले. राष्ट्रवंदनेने शेवट करण्यात आला.संचालन कु. चौधरी मॅडम यांनी केले.