बाबरवस्तीच्या शाळेत बोलक्या भिंतीचे उदघाटन

0
24

सांगली,दि.03- सागंली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती (पांडोझरी)येथे बोलक्या भिंती वर्गाचे उद्घाटन,सत्कार समारंभ व वृक्षरोपन कार्यक्रम लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे होते.प्रमुख पाहूने व मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगलीचे अमोल शिंदे हे होते. सत्कारमुर्ती डॉ.बी.आर.पवार यांचा व शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करन्यात आला. यावेळी लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेल्या दोन वर्ग खोल्यांमधील भिंती रंगरगोटीने बोलक्या केल्या गेल्या,त्यासाठी डॉ.बी.आर.पवार,डॉ संभाजी जाधव यांनी शाळेला आर्थिक मदत करुन सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.त्या बोलक्या भिंती वर्गखोलीचे आर.डी.शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.प्रास्तविक उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे यांनी केले.तालुका मुख्यालयापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बाबरवस्ती शाळेला जायला कच्चा रस्ता,जवळ माळरान पण या मुरमाड जमीनीवर शाळारूपी नंदनवन तेथील पालकांच्या व नागरिकांच्या मदतीने शाळेतील शिक्षकांनी साकारले आहे.यावेळी पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.सोबतच डॉ .पवार, शेख साहेब,के.बी.पुजारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शेख साहेब ,रामचंद्र राठोड, के.बी.पुजारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम गडदे, समिती अध्यक्ष कविता कोरे तसेच दिलीप वाघमारे ,चंद्रकांत कांबळे , मारूती बाबर,तुकाराम बाबर,केरुबा गडदे,दऱ्याप्पा गडदे,ऐवळे सर,सुरेश गडदे,गुलाब गडदे,विठोबा कोरे,संजय औरादे, शिवाप्पा कोरे,अमसिध्द कोरे, हणमंत तेली,जयराम शिंदे, शोभा बाबर,सौ.सविता मोटे,सौ. राजश्री मोटे,सौ.साविञी मोटे, सौ.सजाबाई मोटे ,शोभा बाबर,शरद कारंडे,सोनवणे सर,बालाजी पडलवार,करडी सर, पञकार रियाज जमादार,संजय मोटे बिराप्पा कोरे, सागर पाहून दे, रमेश कोरे उपस्थित होते.संचालन शाम राठोड यांनी केले तर आभार पाडवी यांनी मानले.