आझाद मैदानावर पदविधर अंशकालिन कर्मचार्यांचा मोर्चा

0
45

मुंबई,दि.03-पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा महाक्रांती मोर्चा येथील आझाद मैदानावार काढण्यात आला.या पदवीधर अंशकालीन कर्मचार्यांना काँग्रस सरकारच्या काळात १०% आरक्षण देवुन आंदोलन शमवण्याचे प्रयत्न केले होते.परंतु गेल्या पंधरा वर्षापासुन संघटनेच्या पदाधिकार्यानी “थेट नियुक्ती” या मागणीसाठी संघर्ष सुरुच ठेवले असून सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे कंटाळुन “महाक्रांती मोर्चा ” या बँनरखाली थेट नियुक्ती झालीच पाहीजे,अब की बार रेखा ताई के हातो मे जीआर च्या घोषणा देत आंदोलनाला पुन्हा सुरवात केली आहे.राज्य़भरातील हजारो आंदोलकांनी आझाद मैदानावर हजेरी लावली आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मंत्री संभाजी पाटील निलेगेकर (मंञी किमान कौशल्य विभाग) यानी 15/02/2017 पर्यत निर्णय पारित करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.परंतु त्या आश्वासनाचे काय झाले हे सुध्दा कळायला मार्ग राहिलेला नाही.त्यामुळे पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष रणजित चव्हान,प्रदेश उपाध्यक्ष अ.सईद हं हामीद,प्रदेश सचिव मिलींद भोले,अफरोज कुरेशी,संजयकुमार बिलोलीकर यांसह महारास्ट्रातील प्रत्येक जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष सहभागी झाले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर मोर्च्याची सांगता करण्यात आली.