शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल सुरु

0
16

नागपूर,दि.22:- शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग तसेच अल्पसंख्याक विभागाद्वारे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीकरीता राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ‘MahaDBT’ पोर्टल विकसीत केले आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, ९ वी व १० वी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती, अपंग शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच सर्व शिष्यवृत्तीचे अर्ज https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. याकरीता बँक खात्यासोबत आधार क्रमांक लिंक केलेला असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज भरतांना काही अडचणी निर्माण झाल्यास सदर संकेतस्थळावर ‘मदत’ या पर्यायामध्ये मार्गदर्शिका व उपयोगकर्ता पुस्तिका सुलभ संदर्भासाठी देण्यात आलेल्या असून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.