दाभोळकरांचा लढा जनजागृतीसाठी होता

0
12

भंडारा,दि.22 : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी भारतीय संविधानाला प्रमाण मानून अंनिसचे ध्येय ठरविले. त्यांचा हा लढा मानवमुक्तीचा लढा आहे. अनिष्ठ रुढी परंपरेच्याविरोधात डॉ. दाभोळकरांचा लढा सर्वसामान्यांच्या जनजागृतीसाठी होता, असे प्रतिपादन हर्षल मेश्राम यांनी केले.
महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीने आयोजित जबाब दो आंदोलनादरम्यान त्यांनी प्रतिपादन केले. दाभोळकर यांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण होऊन शासनाला अद्याप मारेकºयांना व सुत्रधारांना अटक करता आले नाही. यासाठी संपूर्ण महाराष्टÑात जबाब दो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी हर्षल मेश्राम हे होते. अतिथी म्हणून हिवराज उके, भामुमोचे जिल्हाध्यक्ष बळीराम सार्वे, अविल बोरकर उपस्थित होते. आंदोलनाची पार्श्वभूमी प्रा. नरेश आंबिलकर यांनी सांगितली. याप्रसंगी पृथ्वीराज शेंडे, बासप्पा फाये, चंद्रशेखर भिवगडे, कन्हैया नागपुरे, प्रा. के. एल. नान्हे, सुजाता घोडीचोर, डॉ. प्रविण थुलकर, अश्विनी भिवगडे, प्रा. युवराज खोब्रागडे, अमित मेहर, केशवराव बिसने, नरहरी नागलवाडे, निकेत हुमणे यांनी डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी सुरु केलेला वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला. अविल बोरकर, बळीराम सार्वे, हिवराज उके, विष्णुदास लोणारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अश्विनी भिवगडे यांनी समतेवर आधारित गीत सादर केले. कार्यक्रमाला त्रिवेणी वासनिक, सुरेश निर्वाण, लिलाधर बन्सोड, विजया हुमणे, टेकराम मेश्राम, दिपक कुंभलकर, बबलु साकोरे, विवक रामटेके, शेषराव श्रावणकर, पुरुषोत्तम कांबळे, शंकर गिरी, सलीम पठाण, ज्ञानेश्वर निकोरे, रमेश बोंदरे, शामलाल काळे यांनी सहकार्य केले.