शिक्षकांचे आॅनलाईन कामाविरोधात आंदोलन

0
10

यवतमाळ,दि.02 : शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून मोबाईलवर पाठविले जाणारे आदेश यापुढे पाळायचेच नाहीत, असा एल्गार पुकारत सर्व शिक्षक संघटनांनी आॅनलाईन कामे झिडकारली आहेत. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सोमवारी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांपुढे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. तर शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रूपमधून अधिकाºयांना धडाधड काढून टाकण्यात आले.
शिक्षक संघटना समन्वय कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन तालुका समन्वय समिती तयार करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून स्थानिक पंचायत समितीसमोर धरणे देण्यात आले.आॅनलाईन कामांसाठी प्रत्येक केंद्रावर डाटा एंट्री आॅपरेटर व ब्रॉडबॅण्ड कनेक्शनची व्यवस्था करण्यात यावी, पोषण आहाराचा धान्यादी किराणामाल शासनानेच पुरवावा, मुख्याध्यापकावर खरेदीची सक्ती करण्यात येऊ नये, अधिकाºयांनी मोबाईलवर आदेश पाठवू नये, लेखी स्वरुपात पाठवावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. बहिष्काराचा पुढील टप्पा म्हणून ९ आॅक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आंदोलन होणार आहे.