आलदंडीवासीयांनी ६ भरमार जमा करुन केला नक्षल्यांचा निषेध

0
18

एटापल्ली,दि. २: महात्मा गांधी जयंतीनिमित्याने अहिंसेचा मार्ग अवलंबवित तालुक्यातील नक्षलदृष्ट्या संवेदनशिल असलेल्या आलदंडी गावातील नागरीकांनीआपल्याजवळील ६ भरमार रायफल रायफल जमा करुन नक्षल्यांचा निषेध करीत विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा संकल्प केला.नव्याने स्थापन झालेल्या पोलीस मदत केंद्र आलदंडीचे प्रभारी पोलीस अधिकारी योगेश दाभाडे यांनी नागरीकांसाठी तसेच शालेय विद्याथ्र्यांसाठी जिल्हा पोलीस व एसआरपीएफ यांच्या माध्यमातून नवनवीन योजना राबविल्या आहेत. त्याचबरोबर शासनाच्या योजनांची माहिती परिसरातील सर्व गावांमध्ये देवून गावकर्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी ग्रामभेटीदरम्यान गावातील नागरीकांना पोलीस दलाला सहकार्य करण्याबद्दल आवाहन केले होते. या आवाहानाला आलदंडी गाववासीयांनी प्रतिसाद देत शस्त्र न उचलण्याचा निश्चय करीत आपल्याजवळील भरमार रायफल पोलीसांकडे जमा करुन नक्षलवाद्यांचा धिक्कार केला. यावेळी आलदंडीचे प्रभारी अधिकारी योगेश दाभाडे, एसआरपीएफ ग्रूप ६ चे पोलीस उपनिरीक्षक जोशी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.