राज्यातील ३२ शिक्षकांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

0
25

औरंगाबाद दि. १६ -:बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यामाने जीवन गौरव मासिकाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्यातील शिक्षक बंधूभगिनिंना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा येत्या ०७ जानेवारी २०१८ रोजी मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी सभागृह शासकीय दुधडेरीच्या मागे जालना रोड औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील एकूण ३२ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतीचिंन्ह, मानपञ, शाँल, पुस्तक देऊन गौरविले जाणार आहे.महाराष्ट्र राज्यातील निवड झालेल्यामध्ये दिलीप भगवान जाधव- श्री शिवाजी हायस्कूल औरंगाबाद , श्रीमती निशा देविदासराव कुलकर्णी – महानगर पालिका केंद्रीय प्रा. शाळा औरंगाबाद , श्रीमती सविता गोविंदराव राठोड – स्वामी विवेकानंद विद्यामंदिर औरंगाबाद , शंकर नामदेव गच्चे – जि.प.प्रा.शाळा लिंबोणी जालना, विशाल वामन गुजर – बालाजी प्रा.विद्यालय वालसावंगी जालना, शेख महेमुद अमिनोद्दीन – राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगांव परभणी, श्रीमती तुकारामसिंह बैस (चंदेल) – जि.प. प्रा.शाळा बाचोटी नांदेड , श्रीमती सुप्रिया दामोदर दापके – जि.प.प्रा.शाळा चिंचोर्डी हिंगोली, श्रीमती मीरा रामहरी गुळभिले – जि.प.प्रा.शाळा कुंबेफळ बीड, सोपान जयसिंग पवार – विद्याभवन हायस्कूल कळंब उस्मानाबाद , श्रीमती माधुरी छगनराव वलसे – जि.प.प्रा.शाळा शासकीय वसाहत लातूर, श्रीमती सविता जयंतराव धर्माधिकारी – जि.प.प्रा.शाळा वरवंटी लातूर, श्रीमती मेधा महेश कानिटकर – श्री संत ज्ञानेश्वर मा.विद्यालय कोथरुड पुणे , श्रीमती माधुरी प्रमोद वेल्हाळ – जि.प. प्रा.शाळा रायवाडी पुणे, श्रीमती शितल अभिमन्यू निमकर – जि.प.प्रा.शाळा करकंब सोलापूर , श्रीमती जयमाला सुभाष चव्हाण – जि.प.प्रा. शाळा सोनगांव तर्फे सातारा, महादेव आनंदा हवालदार – जि.प.प्रा.शाळा बांबवडे सांगली, श्रीमती प्रा.सुषमा अरुण पाटील – एम आर मा.व .उ.शाळा गडहिंग्लज कोल्हापूर , श्रीमती अनघा रमेश सावर्डेकर – जि.प.प्रा.शाळा शेलारवाडी रत्नागिरी , दत्ताञय गणपत शिंदे – शांतिकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा पालघर, श्रीमती अर्चना प्र.खोब्रागडे – जि.प.उ.प्रा.म.शाळा बोरीअरब यवतमाळ , संदिप कृष्णा जाधव – जि.प. प्रा.शाळा देवघर रायगड , श्रीमती अलका विष्णू धाडे – जि.प. उ.प्रा.शाळा पारखेडा बुलढाणा, नरेंद्र पांडूरंगजी चिमणकर – साविञीबाई फुले प्रा.शाळा अकोला, भानुदास दगडू रामोळे – जि.प.प्रा.म.शाळा एकतोडपाडा नंदूरबार, श्रीमती वर्षा आबासाहेब अहिरराव – यादव देवचंद पाटील मा.विद्यालय मेहरुण जळगाव , श्रीमती शीतल सुनिल बडगुजर – स.न.झंवर विद्यालय पाळधी जळगाव, श्रीमती अर्चना राजेंद्र सोनवणे – जि.प.शाळा जूनीसांवगी धूळे , नामदेव लक्ष्मण बेलदार – जि.प.प्रा.शाळा वेळूंजे नाशिक , श्रीमती अनुराधा रघुनाथ तारगे – जि.प. प्रा.शाळा गवळवाडी नाशिक , श्रीमती वैष्णवी प्रकाश कापसे – संस्कार विद्यासागर इंग्लिश स्कूल देवनगर नागपूर , जयराम श्रीरंग सातपुते – जि.प.प्रा.कें.शाळा तिसगांव अहमदनगर यांचा समावेश आहे.