शिक्षक मंचच्यावतीने पालकमंत्री बडोले यांना दिले निवेदन

0
8

गोरेगाव- येथील सहयोग शिक्षक मंचच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले. डिसेंबर २0१४ चा पगार त्वरीत काढण्यात यावा, शालेय पोषण आहार मदतनीसांचे प्रलंबीत मानधन काढावे व त्यात वाढ करण्यात यावी, शालेय शिक्षण विभागातील पदोन्नतीची केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, कक्ष अधिकारी व तत्सम पदे शिक्षकांमधून भरावी, १९२ शिक्षकांचे एलआयसी प्रकरण निकाली काढावे, पदवीधर कार्यशाळेत बीएड पात्र शिक्षकांना संधी द्यावी तसेच सवार्गिण विकासाच्या दृष्टीने नक्षलग्रस्त सुचीतून वगळण्यात आलेल्या तालुक्यांचा पुन:समावेश करण्यात यावा आदि मागण्या निवेदनात नमूद आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री बडोले यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात आर.आर. अगडे, सचिव युवराज माने, कोषाध्यक्ष सच्चिदानंद जीभकाटे, अशोक चेपटे, गोपाल बिसेन, अनिल मेश्राम, वामन गोळंगे, शंकर चव्हाण व अन्य उपस्थित होते.