पी.डी. रहांगडाले विद्यालयता अर्पूव विज्ञान मेळावा

0
9

गोरेगाव,दि.२६ः पी.डी. रहांगडाले विद्यालय येथे विज्ञान छंद मंडळाअंतर्गत अर्पूव विज्ञान मेळाव्याचे यशस्विरित्या आयोजन करण्यात आले. विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाचे माजी प्राचार्य पी.एफ. बघेले यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हि.दा.येळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच.डी.कावळे, प्राचार्य वाय.आर.चौधरी, पर्यवेक्षक व विज्ञान शिक्षीका यु.डी. पारधी उपस्थित होते.
विज्ञान मेळाव्यात वर्ग ५ ते १० पर्यंत एकूण ७० प्रदर्शनीय मॉडेल विद्याथ्र्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे संचालन ए.एच.कटरे यांनी केले. कार्यक्रामच्या यशस्वितेसाठी एस.आर. रहांगडाले, एम.डी. रहांगडाले, ए.एस. बावनथडे, वाय.के. चौधरी यांनी सहकार्य केले.शेवटी यशस्वी विद्याथ्र्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषीक देवून सत्कार करण्यात आले.