तंटामुक्त समितीने लावले प्रेमीयुगलाचे लग्न

0
7

सडक अर्जुनी,दि.26ः- तालुक्यातील चिखली गावातील प्रेमी युगलाचे अांतरजातीय विवाह तंटामुक्त समितीने लावून दिले.घरच्यांचा विरोध परंतु दोघांनीही लग्न करण्याची मनात बांधलेली गाठ हेरून त्यांनी तंटामुक्त समितीकडे धाव घेतली व दाद मागितली.त्यावर तंटामुक्त समितीने चिखली येथील माया रमेश मेश्राम व दीपक इंसाराम मडावी यांचे लग्न लावून दिले.या दोघामध्ये पाच वर्षापासून प्रेमसंबध सुरु होते.मात्र दोन्ही वेगवेगळ्या जातीचे असल्याने घरच्यांचा विरोध होता. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष, नामदेव चांदेवार पोलीस पाटील सुभाष मेश्राम, उपसरपंच विश्वनाथ थेर, विलास कुरसुंगे, दीपक थेर, श्रीराम भेंडारकर, सरपंच सुधाकर कुर्वे, युवराज वालदे, तेजाराम धनभाते, उतम उइके, रेवाता तावडे, सविता मेश्राम व गावातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.