विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो – बिसेन

0
74

गोरेगाव,दि.6ः- तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रामकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुर्‍हाडी येथील विद्यार्थी नैतिक राजेंद्र गणवीर या विद्यार्थ्यांने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनित प्रथम क्रमांक पटकावून आदिवास क्षेत्रातील वैज्ञानिक तयार होऊ शकतो. हे सिध्द केले असून मार्गदर्शन मिळाल्याने विज्ञान प्रदर्शनातूनच विद्यार्थ्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन बळवतो असे मत प्राचार्य एस.टी. बिसेन यांनी व्यक्त केले.
ते नैतिक गणवीर या विद्यार्थ्याचा सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते. नैतिक गणवीर याने स्वयंचलित वाहतूक नियंत्रण व दळणवळण या प्रात्याक्षिकाचे सादरीकरण केले. या प्रात्याक्षिकांसाठी प्रा. ग.रा. पांडे, नरेंद्र पटले, एल.आर. गिरी यांचे मार्गदर्शन त्यास लाभले. या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संस्थेच्यावतीने कार्यवाह माजी आमदार केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार व शाळेच्यावतीने प्राचार्य एस.टी. बिसेन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.