स्व.ब्रिजलालजी कटरे हायस्कुलचे स्नेहसंम्मेलन उत्साहात

0
13

गोरेगाव,दि.29ः- तालुक्यातील शहारवाणी येथील स्व.ब्रिजलाल कटरे हायस्कुलचे स्नेहसमेंलन उत्साहात पार पडले.स्नेह सम्मेलन व अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन सेवानिवृत्त वनरक्षक एच. एन. रहांगडाले यांच्या हस्ते माजी सभापती महाराजसींग कोडापे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मंचपूजक म्हणून गंगाझरीच्या ठाणेदार शीतल जाधव,सरपंच दिप्ती पटले, सरपंच राज तुरकर, पोलीस पाटील तेजलाल पटले, केंद्रप्रमुख राजेश लदरे, के.एल.कटरे, जिल्हा बार असोशिएसनचे अध्यक्ष एॅड.टि.बी.कटरे,सहा.उपवनसरंक्षक यू. टी. बिसेन,तुकाराम गौतम,एच.बी.पटले,विनोदजी गौतम,मुख्याध्यापक एस.जे.हरीनखेडे , खेमचंद मेश्राम,कमलकीशोर डोंगरे,छगनलाल गौतम ,सौ.डोंगरे ताई ,सौ.पटलेताई,जे.एच.वैद्य,एस.एस.वासनीक  तसेच  पालकवृंद , गावकरी मंडळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना गुणवत्ता विकासाची जबाबदारी ही शाळा, समाज, तसेच ग्रामपंचायत या सर्वांची असून सर्वांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडल्यास गुणवत्ता विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.सांस्कृतीक कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच दिप्ती पटले यांच्या हस्ते  सुरेशजी नेवारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.दिपप्रज्वलन एम. टी. गौतम यांनी केले.याप्रसंगी नितीन रहांगडाले,विनोद पटले, किरन पालेवार,राजेश पटले व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.बक्षिस वितरण वनपरिक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी विषयतज्ञ के.बी.कटरे,ज्यु.इंजि. जी.टी.पारधी,के.एस.वैद्य,के.डी.बोपचे, बी.जी.बिसेन उपस्थित होते.प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.वाय.कटरे यांनी केले.ए.वाय.टेंभरे,कु.ओ.बी.ठाकरे,एस.एल.बडोले ,के.के.यादव, आर.एस.बीसेन, सी.के.कटरे , बि.टि.चौधरी , डी.एस.बीसेन , एल.आर.दुधबरवे यांनी अथक परीश्रम घेतले