एसएसजे काॅलेज विद्यार्थीप्रतिनिधी पदावर एबीव्हीपीचा प्रशांत विजयी

0
8

अर्जुनी मोरगाव,दि.2ः- येथील  एस.एस.जे. महाविद्यालयाच्या नागपूर विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी पदासाठी झालेल्या निवडणुकीत अ.भा.वि.प. व भा.ज.यु.मोर्चाचा उमेदवार प्रशांत भाष्कर लेंडे विजयी झाला आहे.प्रशांतचे निवडून आल्याबद्दल तालुका भाजपा अर्जुनी/मोर च्या वतीने भाजपा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या येथील जनसंपर्क कार्यालयात पेढा भरवून सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, भाजयुवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप कापगते, नगर पंचायत अर्जुनी/मोर चे उपाध्यक्ष विजय कापगते, बाजार समिती अ/मोरचे उपसभापती लायकराम भेंडारकर,पं.स.सदस्य रामलाल मुंगनकर,माजी सभापती प्रकाश गहाणे, व्यंकटजी खोब्रागडे,नरविस पटले,दिपंकर ऊईके,सुरेंद्रकुमार ठवरे,गुरूदेवजी चांदेवार,बालू बडवाईक आदी मान्यवर उपस्थित होते.