तंत्रज्ञानाच्या युगात आत्मविश्‍वास वाढवा- खा. प्रफुल्ल पटेल

0
5

साकोली,दि.15ः- आज शिक्षणाचे महत्त्व वाढले असून फक्त शिक्षणाने विचारांना दिशा मिळत नाही. त्याबरोबर सर्व सांस्कृतिक, शारीरिक व स्पर्धात्मक क्षेत्रात आवड व छंद निर्माण करणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात आपला आत्मविश्‍वासच आपल्याला तारतो. आधुनिक तंत्रविज्ञान आजच्या पिढीसमोर असल्याने ती भाग्यवान आहे. फक्त ते आत्मसात करता आली पाहिजे. लिंगभेद न ठेवता एकमेकांशी जवळीक साधून ज्ञान प्राप्त करता येते, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
एम. बी. पटेल कॉलेजच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी मंचावर माजी आमदार राजेंद्र जैन, प्रा. डॉ. त्रिवेदी, अविनाश ब्राम्हणकर, डॉ. चंदवाणी, रामचंद्र कोहळे, हेमकृष्ण वाडीभस्मे व इतर मान्यवर उपस्थित होते. समारंभात विविध विषयात प्राविण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा व प्राध्यापकांचा पारितोषिक देऊन सत्कार रकण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्यडॉ. त्रिवेदी यांनी तर अहवाल वाचन वाढईयांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. खुणे यांनी मानले.