स्व. रामकिशोर कटकवार जयंतीला गुणवंतांचा सत्कार

0
10

गोंदिया ,दि.15ः-उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोंदियाद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह शाळेमध्ये संस्थेचे संस्थापक व प्रेरणास्त्रोत स्वर्गीय रामकिशोर कटकवार यांची ७८ वी जयंती साजरी करण्यात आली.
प्रोग्रेसिव्ह चिल्ड्रन क्लबद्वारा आंतरशालेय कथा कथन, कविता, चित्रकला, भाषण वाद-विवाद, सामान्य ज्ञान, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, इंग्लिश, हिंदी, मराठी, सीबीएसीई, आयसीएससी शाळा व प्रोग्रेसिव्ह सायन्स ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात स्व. रामकिशोर कटकवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तथा पूजन करुन करण्यात आली. संस्था सचिव डॉ.निरज कटकवार यांनी विद्यार्थ्यांना स्व. कटकवार यांची जीवनशैली, आदर्श व कार्यशैली या विषयी मार्गदर्शन केले. संस्थेचे आधारस्तंभ उमादेवी आर. कटकवार, अध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार, उपाध्यक्ष अल्का पी. कटकवार, सहसचिव पद्मा कटकवार आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय.आशा. राव, कुलदीप भौतिक, अभय गुरव, विणा कावळे, कृष्णा चव्हाण, निधी व्यास आदींनी परिश्रम घेतले.