28.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक पालकमंत्र्यांच्या हस्ते शिक्षक वैद्य यांचा सत्कार

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिक्षक वैद्य यांचा सत्कार

0
36

गोरेगाव,दि.19ऋःग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देऊन सुमारे ५0 च्या वर विद्यार्थ्यांना नवोदयसारख्या परीक्षेत उत्तीर्ण करणारे सोनी जिल्हा परिषद शाळेतील सहायक शिक्षक संजय वैद्य यांचा १५ ऑगस्ट रोजी पोलिस मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मागील १२ वर्षांच्या काळात शिक्षक वैद्य यांनी पर्शिम घेऊन अनेक विद्यार्थी घडविले. राहणीमाना पासून ते शिस्त, अक्षर वळण एवढ्यावरच न थांबता स्कॉलरशीप व नवोदयसारख्या कठीण परीक्षेसाठी विद्यार्थी तयार केले. विशेष म्हणजे, सन २0१७-१८ या वर्षात वरिष्ठ पूर्व माध्यमिक शाळा परसोडी येथील एकाच वगार्तील ९ विद्यार्थ्यांची त्यांच्याच मार्गदर्शनात नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. अशा या कार्यकर्तृत्त्वाचे सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.