पेंशन दिंडी मुंबईसाठी तालुक्यातून जाणार 500 dcps धारक

0
15

जुनी पेंशन हक्क संघटना- जत येथे बैठक

सांगली,दि.17ः- जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने ठाणे ते मुंबई पायी पेंशन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.याचे पूर्व नियोजन करण्यासाठी  जत येथे तालुका कार्यकारणी व पेंशन हक्क संघटनेच्या शिलेदारांची बैठक पार पडली.या दिंडीत 500 डीसीपीएसधारक सहभागी होणार असल्याचा निर्णय़ घेण्यात आला.
सन १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना बंद करून अन्याय केला आहे. म्हातारपणी जगण्याचा आधारच शासनाने हिरावून घेतला आहे. तसेच २००५ नंतर सेवेत आलेल्या व अकाली मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांचा जगण्याचा हक्क संपुष्टात आलेला आहे तो म्हणजे अंशदान पेंशन योजनेमुळे.२००५ नंतर सेवेत आलेले आजपर्यंत महाराष्ट्रात दोन हजार कर्मचारी मृत झाले आहेत; सांगली जिल्ह्यात दोन कर्मचारी मयत झाले आहेत. शासनाने या कर्मचाऱ्याच्या कुटुंबास कसलीही मदत दिली नाही.तसेच या कुटुंबाला पेंशनही दिली जात नाही.२००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचार्याची अंशदान पेंशन योजनेच्या नावाखाली कर्मचाऱ्याच्या एकूण पगाराच्या दहा टक्के रक्कम कपात करून घेतली जाते.शासन हिस्सा नाही,की फॅमिली पेंशन दिली जात नाही.त्यामुळे अन्यायकारी पेंशन योजना बंद करून १९८२- ८४ ची जुनी पेंशन योजना लागू करावी.यासाठी राज्यातील सर्वच विभागातील कर्मचारी एकवटले आहेत.जुनी पेंशन मिळावी यासाठी आंदोलन,मोर्चे काढण्यात आले; परंतु शासनाने लक्ष दिले नाही.म्हणून ‘आर-पार-चा ’ निश्चय करून २ ऑक्टोबर रोजी ठाणे ते मुंबई पेंशन दिंडीचे आयोजन केले आहे.मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंत्रालयाला घेराव घालून सामूहिक उपोषण केले जाणार आहे.
या पेंशन दिंडीत १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने सहभागी व्हावे असे आवाहन जत तालुकाध्यक्ष शाम राठोड यांनी केले.

यावेळी म.रा.जु.पे.ह.संघटनचे श्याम राठोड सर,विरेश हिरेमठ,गुरुबसु वाघोली,पडलवार सर,अत्तार सर शाखा जत चे उपाध्यक्ष अशोक आंधळे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पांपटवार, केंद्रसंघटक शिवा औताडे,महादेव टंग्गोळी,रविंद्र सतारी,गवरीश नवराज,माळी सर ,मेश्राम सर,होसमणी सर,दिलीप कांबळे,श्याम सुर्यवंशी,अविनाश मोथरकर, विशाल कोमावार, कडोलकर सर संदिप कांबळे,रवी वारद,प्रकाश माळी ,रविंद्र सतारी,अविनाश बुद्धेवार ,दिगांबर चाटे,रेवन यादव,राजु पाटील,बजरंग जाधव,सुशांत गरदडे,राम घुगे, रामचंद्र घुगे,विशाल कोमावार,शेळके सर,गोपीनाथ नागरगोजे, विठ्ठल जाधव,होसमनी सर,संघटक निरंजन नागरे,एकनाथ भवर ,नल्लेवाड सर,रामटेके सर ,लालु पवार,तानाजी टेंगले,बजंत्री सर,अशोक गरकळ इत्यादी शिलेदार उपस्थित होते.