शिक्षकांच्या प्रश्नांसाठी समितीची लढाई

0
24

गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शनिवार (दि.७) जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. दिलेल्या आश्‍वासनानुसार मागण्यांची पूर्तता न केल्यास पुढील महिन्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणिस एल.यू. खोब्रागडे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित व जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे यांच्या नेतृत्वात प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन व मोर्चा काढण्यात आला.
यात जिल्ह्यातील शिक्षक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी व मुख्य कार्यपालन अधिकारी बी.डी. गावडे यांना देण्यात आले. तसेच त्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची अंमलबजावणी करण्यात आली नाही तर पुढील महिन्यांत जि.प. शिक्षण विभागाच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिक्षण समितीने दिला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, एल.यू. खोब्रागडे, किशोर डोंगरवार, सुरेश रहांगडाले, एन.बी. बिसेन, सतीश दमाहे, संदीप तिडके, ओमप्रकाश वासनिक, पी.आर. पारधी, बी.पी. ठाकरे, शेषराव येडेकर व व्ही.जी. राठोड यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आपल्या भाषणातून वाचा फोडली.
या वेळी एस.सी. पारधी, डी.एल. गुप्ता, टी.आर. लिल्हारे, पी.एन. बडोले, एच.के. पाऊलझगडे, एन.एस. कोरे, एस.एस. खेडीकर, आर.जी. मेश्राम, दिलीप लोधी, वाय.बी. चव्हाण, नरेश बडवाईक, एम.पी. माहुले, जी.एन. बांते, गोवर्धन लंजे, एम.पी.मैकलवार, के.टी. करंजेकर, बी.एस. केसाळे, बी.जे. येरणे, पी.बी. सर्याम, कैलाश हाडगे, आर.एम. कडव, डी.बी. बरैय्या, व्ही.जी.वालोदे, आर.एस. बसोने, ओ.एच. लिल्हारे, यू.जी.हरिणखेडे, अनिल बिसेन, तसेच जिल्हा व इतर तालुक्यातील पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.