कोलपोस्कोपी शिबिराचा शेकडो महिलांना लाभ

0
11

तिरोडा : येथील उप जिल्हा रूग्णालयात महिला दिनाचे निमित्त साधून रविवारी (दि.८) घेण्यात आलेल्या कोलपोस्कोपी शिबिराचा परिसरातील शेकडो महिलांनी लाभ घेतला. नगरपरिषद, अदानी फाउंडेशन, उप जिल्हा रूग्णालय, भगिनी महिला बहुउद्देशीय मंडळ, लायनेस क्लब तिरोडा पावरसिटी, सखी मंच, महिला मानवाधिकार समिती व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्तवतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
उद््घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते नगराध्यक्ष अजय गौर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिक्षक डॉ. एच.एन.मेश्राम, डॉ. शेफाली जैन, डॉ. स्वाती विद्यासागर, डॉ. सुनिता लढ्ढा, डॉ. सोमेश रहांगडाले, सुबोध सिंग, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, सलीम जवेरी, विजय बंसोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. टेभूर्णीकर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. लढ्ढा यांनी कोलपोस्कोपी म्हणजे गर्भाशयाची दुर्बीन द्वारा तपासणी असून महिलांनी गर्भाशयाच्या कँसर बाबत ही तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगीतले. दरम्यान शिबिरात उच्च रक्तदाब, रक्ताची कमी, मधुमेह, ह्दयरोग, नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा, सिकलसेल, अँनिमीया आदि आजारांची तपासणी करण्यात आली. यासाठी डॉ. रेखा दुबे, डॉ. प्रतिभा पारधी, डॉ. प्राची मिश्रा, डॉ. नागेश शेवाळे, डॉ. सोनम लढ्ढा, डॉ. कंचन रहांगडाले, डॉ. स्वाती राऊत, डॉ. प्रिया ताजने, डॉ. अर्चना गहेरवार,यांनी सहकार्य केले. याप्रसंगी विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. संचालन देवका उरकुडे व राखी गुणेरिया यांनी केले. प्रास्तावीक ममता बैस यांनी मांडले. अभार शाईनबेग मिर्जा यांनी मानले.