सहायक शिक्षकाने दिली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाला शिवीगाळ

0
11

गोंदिया,दि.27: देवरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ओवारा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक्ष मंगेश बोरकर यांनी कुठलेही कारण नसतांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव लाडे यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणामुळे गावातील नागरिक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सदर शिक्षकाची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नोंदविली आहे.
सविस्तर असे की, शाळेचे मुख्याध्यापक भोयर यांनी २३ ऑक्टोबर रोजी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला सरपंच हिरामन टेकाम, उपसरपंच कमल येरणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष देवेंद्र डोये, पोलीस पाटील कैलास वलके व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. बैठक सुरु असताना सहाय्यक शिक्षक मंगेश बोरकर यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव लाडे यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला. तसेच अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत तक्रार करण्याची धमकी दिली. तक्रार न देण्यासाठी १ लाख रुपयाची मागणी ही केली. त्यामुळे बैठकीत वातावरणच तापले गेले. काही पदाधिकाèयांनी मध्यस्ती करीत शिक्षक बोरकरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बोरकर यांनी हा व्यक्ती शाळा व्यवस्थापन समितीमध्ये चालणार नाही. जर हा समितीमध्ये राहिला तर मी मुलांना शिकविणार नाही तसेच कलार समाजाच्या मुलांनाही शिकविणार नाही व इतरांना शिकू देणार नाही असे बोलून कलार समाजातील पालकांचा अवमान केला. त्यामुळे भावना दुखावलेल्या कलार समाजातील पालकांनी मुलांना शाळेत पाठविणेच बंद केले आहे. सोबतच जो पर्यंत शिक्षकाचे स्थानांतरण होत नाही तोपयर्Ÿंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर बैठकीत शिक्षक बोरकर यांनी लाडे यांच्यावर केलेले आरोप द्वेषपूर्ण भावनेतून असल्याचे व खोटे असल्याचे बैठकीतील उपस्थितांनी लेखी स्वरुपात म्हटले आहे. तर वातावरण शांत करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदावरुन लाडे यांना हटवून त्याच सभेत ममताबाई बिसेन यांची निवड करण्यात आली आहे. सोबतच नामदेव लाडे यांच्यावर १५ हजार रुपयाचा दंड या बैठकीत आकारण्यात आलेला आहे. या सर्व प्रकरणामुळे कला समाजातील १४ पालकांनी आपल्या मुलांची टिसी देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले असून त्या निवेदनात नामदेव लाडे, मुलचंद मुन्नालाल उके, योगराज अनतराम मेश्राम, भोजराज ताराचंद मेश्राम, जिर्गीन्दराज दयाराम शहारे, दिनेश किशन लाडे, ओमप्रकाश रामाजी लाडे, उर्मिला योगराज बावनथडे, ग्यानीराम लाडे, श्यामलाल तुकाराम लाडे, चुन्नीलाल बावनथडे, हेमराज मेश्राम, श्रीराम मानकर, नत्थू मानकर, यशवंत मेश्राम, पुरुषोत्तम मेश्राम, तेजराम कावडे, मनिराम उके,रेखा मेश्राम, वसंत मानकर, रेखा लाडे, शितल लाडे, लता मेश्राम आqदच्या स्वाक्षèया आहेत.