26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक राष्ट्रज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0
45

नाशिक,दि.07ः- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा नाशिक यांच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय क्रांतीज्योती गुणवंत शिक्षक पुरस्कार
सौ. प्रेमजीत सुनिल गंटीगंते मुंबईयांना नाशिक येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.सदर पुरस्कार वितरण समारंभासाठी राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ, राज्य सरचिटणीस राजेंद्र म्हसदे,राज्यनेते जीवन कांबळे, शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी, नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षा शितलताई सांगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मालेगाव लक्ष्मण राऊत, तसेच रामचंद्र जाधव शिक्षण उपसंचालक नाशिक, इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी जगताप मॅडम, सुनिल गंटीगते इ मान्यवर उपस्थित होते.