भाग्यश्री मुनेश्वर नंदेश्वर काव्यवाचन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

0
16
लाखनी,दि.17ः- महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, आयोजित राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी व गदिमा- पूल यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने रंगमंच अविष्कार स्पर्धा,एकपात्री अभिनय व काव्यवाचन स्पर्धा माध्यमिक व महाविद्यालयीन या दोन गटांत आज जे एम पटेल महाविद्यालयात घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांतील ७५ हुन अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात समर्थ विद्यालयातील कु भाग्यश्री मुनेश्वर नांदेश्वर या विद्यार्थिनीस काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक आणि अभिनय स्पर्धेत पाचवे स्थान मिळविले असुन १ आणि २ फेब्रुवारीला पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तसेच चेतना विष्णुदास तळवेकर ही एकपात्री अभिनयात महाविद्यालयीन गटातून चौथे पारितोषिक,  माध्यमिक गटातून  काव्यवाचन स्पर्धेत वैष्णवी संजय सिंगणजुडे द्वितीय व अभिनय स्पर्धेत तृतीय क्रमांक तर वैष्णवी महेश मेश्राम हिला अभिनय स्पर्धेत पाचवे स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थिनी समर्थ विद्यालय, लाखनी येथील विद्यार्थिनी  आहेत. याप्रसंगी सुप्रसिद्ध नकलाकार डॉ संगीता टेकाडे, सुप्रसिद्ध कलाकार आकाशवाणी निवेदक बळवंत भोयर, प्रा डॉ भरातभूषण शास्त्री यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाकडून प्रशस्तीपत्र देण्यात आली. स्पर्धकांना अजिंक्य भांडारकर व अक्षय मासुरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर, प्राचार्य दा ई प्रधान, उपप्राचार्य कि मो आळे, पर्यवेक्षक व्ही व्ही खेडीकर यांनी अभिनंदन केले.